आम्हाला पुतळे नकोत, ग्रंथालये हवीत. येणाऱ्या पिढीला बाबासाहेब-अण्णा भाऊ यांच्या समाजवादी व्यवस्थेचे स्वप्न तर समजून घेऊ द्या, पण अशी मागणी कोणीही करत नाही
गांधीजींनी १९४२ साली चार शब्द उच्चारले- ‘क्विट इंडिया’. संपूर्ण देश पेटून उठला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एवढेच म्हणाले- ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’. एक संपूर्ण समाज हा शिक्षणासाठी, संघटनेसाठी व संघर्षासाठी सिद्ध झाला. सुभाषबाबू म्हणाले, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा।’ लाखो भारतीय त्यांच्यासोबत निघाले. आज ‘भारत स्वच्छ करो’ची घोषणा केली जाते, पण त्याचा परिणाम काय, तर.......